रुह-d-Soul

Published on : 13-Feb-2022 14:33:04

थोडेसे ब्लॉग विषयी...
नमस्कार,
आज मी तुम्हाला माझ्या या ब्लॉग विषयी थोडक्यात सांगू इच्छिते,
ब्लॉग सुरु करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे लेखनाची आवड. तसं मला लिहायला खूप आधीपासूनच आवडायचं. मध्यंतरीच्या काळात लेखन कार्य थोडे मागे पडलं, पण उपजत असलेली लेखनाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यातूनच या ब्लॉगचा जन्म झाला आहे असं मी म्हणेन. माझ्यावर, माझ्या लेखनावर प्रेम करणाऱ्या अनेक व्यक्तींनी मला या ब्लॉग लेखनासाठी प्रेरणा दिली. मी तर म्हणेन सतत त्यांच्या ब्लॉगच काय झालं ? किती लिहिलंस? काय काय लिहिलंस? अशा प्रश्नांनीच मी जरा ब्लॉगचं सिरीयसली मनावर घेतलं आणि सुरु झाला ब्लॉग लेखनाचा प्रवास. ही जरी सुरुवात असली तरी मला मनोमन खात्री आहे की, या ब्लॉग मधील बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाला स्पर्श करून जातील. मनाला भावतील.कधीतरी अगदी माझ्या मनातले विचार इथे कसे काय आहेत असा प्रश्न पडावा इतकं हे लेखन तुम्हाला आपलसं वाटेल याच मी तुम्हाला आश्वासन देते.
या ब्लॉगचं नामकरण करण्यासाठी देखील थोडा वेळ मला घ्यावा लागला.शेक्सपियर म्हणून गेले...नावात काय आहे? पण खरं सांगू का नावात खूप काही आहे असं मला तरी वाटत. या ब्लॉगचं नामकरण करण्याआधी थोडं डोकं नक्कीच पिंजवाव लागलं, आणि त्यातूनच रुह-d-Soul (Ruh-d-Soul ) हे नाव अखेरीस ठरलं. हे नाव जरी उर्दू भाषेतलं वाटत असलं तरी त्यातून जो अर्थ निघतो तोच या ब्लॉगचा गाभा आहे असं मी म्हणेन. अगदी आत्म्याच्या, मनाच्या जवळ जाणारं, मनाला स्पर्श करणार लेखन असा सरळ अर्थ मी यातून घेऊन हे नाव या ब्लॉगसाठी निवडलं आहे. त्यामुळेच माझं हे लेखन तुम्हाला नक्कीच आपलसं वाटेल असा विश्वास आहे.
ब्लॉगच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळणे, चांगले विचार तुमच्यापर्यंत पोहचवणे आणि आपल्यासोबत संपर्कात राहणे असा मानस आहे.या ब्लॉग मधील लेखन हे शुद्ध भावनेने केलेले असेल. त्यातील प्रत्येक लेख हा वेगळा असेल असा कायम प्रयत्न असेल. या ब्लॉग मधील सर्वच लेख माझ्या आयुष्याशी निगडीत असतीलच असे नाही आणि तसे जर असेल तर मी स्वतः त्या लेखात स्वानुभव म्हणून उल्लेख करेनच. ब्लॉग वाचून झाल्यावर comment करताना लेखिकेच्या व लेख वाचणाऱ्या इतर वाचकांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची comment करणाऱ्यांनी नोंद घ्यावी.लेख आवडल्यास किंवा न आवडल्यास काही सुधारणा असल्यास जरूर कळवावे. आवश्यक ते बदल वेळोवेळी करण्याचा प्रयत्न असेल. धर्म, जाती, प्रांत यावर आधारित comment करू नये.ही कळकळीची विनंती.

रुह-d-Soul

Share On

Back


Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by MaharashtraInfotech