नकारात्मक vs सकारात्मक - भाग १

Published on : 21-Feb-2022 13:18:31

नकारात्मक vs सकारात्मक - भाग १
आज एका वेगळ्या विषयावर बोलायचा मोह होतो आहे. बऱ्याचदा मला हे आवडत नाही, मला हे जमत नाही, मी हे का करू? अशी अनेक नकारात्मक वाक्य आपल्या आजूबाजूला कानावर पडत असतात. पण बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडो अगर न आवडो त्या आपल्याला कराव्याच लागतात. यासाठी उदाहरणच द्ययाच झालच तर आईला कराव लागणार मुलाचं उत्तम संगोपन हे उदाहरण इथे चपखल बसेल.आता तुमच्यापैकी बऱ्जाचजणांना हे दिलेलं उदाहरण पटणार नाही वा आवडणार नाही. आईला आपल्या मुलांच संगोपन करायला आवडतच.. न आवडण्याचा प्रश्नच येत नाही असा विचार तुमच्या मनात आलाच असेल.पण स्वतःशी प्रामाणिक राहून विचार करा आणि आठवा मुलाचं संगोपन करताना तुमची कधीच चिडचिड झाली नाहीये का? स्वतःला त्रास तुम्ही करून घेतला नाहीये का? याच उत्तर होच असेल. आणि त्यात काही गैर नाही.कारण संगोपन करणं हे जोखमीच, कष्टाचं, मायेचं, प्रेमाचं काम आहे त्यात गंमत म्हणून संगोपन केलं, खेळ म्हणून संगोपन केलं असं आपण म्हणूच शकत नाही आणि जेव्हा आपण कष्टाची, मायेची, प्रेमाची, जोखमीची कामे करतो त्यावेळी ती मायेनी जरी करत असलो तरी थकवणारी, त्रास देणारी असूच शकतात. पण आपण त्या कामात जर गोडी निर्माण करू शकलो तर अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ शकतात आणि आई मुलाचं संगोपन करताना हेच तंत्र वापरते म्हणूनच तुमच्यापैकी बऱ्याच आयांना माझ वर दिलेलं उदाहरण पटल नसेल.
आता महत्वाचा मुद्दा काय आहे? तर वरील सर्व गोष्टीतून काही गोष्टी आपण सहज शिकू शकतो. सर्वात आधी ज्या गोष्टी तुम्हाला शिकणं आवश्यक वाटत त्या नक्की शिकून घ्या,नंतर ज्या गोष्टी तुमच्या आटोक्यात आहेत त्या शिकून घ्या हे सर्व केल्यावर तुमच्या लक्षात येईल आपल्याला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याही आपल्याला जमू लागल्या आहेत. तात्पर्य काय, कोणतीही गोष्ट करून पाहण्याच्या आधीच मला जमेल का? मी करू शकेल का? अश्या प्नश्रांना पायदळी ठेऊन प्रयत्न करा. जगात अशक्य असं काही नाही. फक्त सुरुवात करण गरजेचं असत. मला असा अनुभव आला आहे. तुम्हालाही असा अनुभव नक्की येईल याची खात्री आहे.
करताय ना मग सुरुवात? तुमच्यापैकी कोणीही जर अशी सुरुवात केली असेल तर comment मध्ये नक्की सांगा. कदाचित तुमच्या त्या सकारात्मक comment मुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल.
लवकरच भेटू, एका नव्या अनुभवासह.

रुह-d-Soul

Share On

Back


Copyright © 2021 MI. All rights reserved | Developed by MaharashtraInfotech