
मैत्री..
लक्षावधी वर्षांनी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात,
पण त्यात एखादाच मित्र असतो.
मित्र म्हणजे काय तर....
तहान लागल्यावर पाण्याची किंमत कळते,
तशी गरज लागल्यावर मित्राची किंमत कळते...
कामापूरता मामा (पुरे-पुर वापर करणारा मित्र)
नेट प्रॉब्लेम आहे रे...उद्या देतो, काय पळून चाललोय काय?
ए टी म ब्लॉक झालंय... पगार झाला नाही,
काय सांगू आत्ताच गाडीचा हफ्ता दिलाय, पुढच्या महिन्यात पगार
झाल्या-झाल्या तुलाच देणार... फक्त आठवण कर मित्रा...
बस का भावा-विसरला का?
काय हिरो-एकटा एकटा कुठे फिरतो,
आम्हालाही बोलवायचं-आलो असतो की...
वहिनी माहेरी गेली वाटतं, लई खुप दिसतोय असे जखमेवर मीठ चोळणार मित्र.
अरे ती नाही म्हणाली म्हणून काय झालं? जगात ढिगानी पडलेत, ती काय इंद्राची परी आहे का, दुसरी शोधू असे समजून काढणार मित्र.
स्टेटस भारी-भारी टाकतो, आपल्याच शाळेत होतास ना मित्रा. किंव्हा शेवटी मित्र कोणाचा...
असे क्रेडिट स्वतः ओढून घेणार...
कोण रे ती लाल ओढणीवली स्टेटस मध्ये? असे अनेक-अनेक न सुचणारे प्रश्न,
उत्तर न देऊ शकणारे प्रश विचारणारा मित्र.
अरे कुठे आहेस मित्रा, खुप दिवस झाले भेटलो नाही, भेट एकदा बसू.....
चौकात भेटल्यावर, काय मित्रा काय चालले आहे, चल वन बाय टू चहा घेऊ... थांब पैसे देतो असे म्हणून काय दहा रुपयाची किंमत करतो रे म्हणणारा मित्र.
हॉटेल मध्ये गेल्यावर, दाबून रोट्या हाणणारा ... टेबलावर बिल आल्यावर - अरे राहूदे मी देतो म्हणणारा आणि कॅश काउंटरवर आल्यावर अरे कॅश नाही रे थांब ऑनलाइन करतो आणि गूगल पे / फोन पे होत नाही, इंटरनेट प्रॉब्लेम आहे राव... असे सांगणारा मित्र.
शाळा / कॉलेजमध्ये असताना, ते बघ मित्रा, तुकडी ब त्यात पुढून चार नंबर बेंच,
केसांचा कोंबडा, चेहऱ्यावर केसांची बट असणारी आज पासून तुझीच ही वहिनी... सांगणारा मित्र.
ऑफिस मध्ये असताना, अरे समजलं का आज नवीन जॉईनिंग, कुठे राहते, आधी कुठे जॉब ला होती, ही सर्व माहिती काढणार मित्र.
ती तुझ्यासोबत जास्त बोलते भावा, मला आवडते, बघ काय तुझ्या गरीब भावाचं जमतंय का? एकदा-एकदाच माझ्या बद्दल विचार.... असे बोलून उत्तर न आलेला मित्र म्हणतो, चल काय फरक पडत नाही,
मला आधीच माहीत होतं ती माझ्यावर नाही पण तुझ्यावर जास्तच लट्टू आहे. पार्टी पाहिजेच भावा...
संध्याकाळी बसू रे एक गम मे और एक खुशी मे पेग मारू.. असे म्हणणारा मित्र. फुल्ल झाल्यावर गपचूप घराच्या
दरवाज्या पर्यंत सोडणार मित्र.
दुसऱ्याच्या प्रेयसीला आपल्यामित्रा बद्दल मीठ, मिरची, गरम मसाला चोळून काडी लावणारा
गद्दार मित्र, समोर गोड आणि मनात काहीतरी कांड करणारा मित्र.
खांद्यावर नाचावणार, कधी पाय खाली खेचनार मित्र.
चौकात भांडण झालं, चल पुढे आलोच पोरं घेऊन म्हणणारा मित्र.
त्यानी मला मारली म्हणून काय गप्प बसायचं का? मी दोन खाल्ले पण एक टाकली त्याला.
जेल मध्ये त्यालाच का ठेवता, एकटा कसा राहील, मला पण टाका आत.
आपले मित्र ना राजा ना वजीर पण,
मॅटर झाल्यावर दोन मिनिटात हाजीर !
जीवाला जीव देणारा एखादाच असतो, त्यालाच मैत्री म्हणतात.
विहिरीत/नदीत पोहता येत नसून, तू मार उडी मी आहे की, बुडायला लागला की आहेच मी, असे म्हणणारा मित्र
खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही.
साथ देणारे मित्र भरपूर आहेत
हे सर्वांना कळू दया.
रुह-d-Soul