
झाले बहु, होतील बहु, आहेत ही बहु, परंतु या सम ही : स्मिता पाटील : एक अस्सल मराठमोळ सौंदर्य
स्मिता पाटील : एक अस्सल मराठमोळ सौंदर्य
स्मिता पाटील . माझी एक अत्यंत आवडती अभिनेत्री ! 17 ऑक्टोबर हा स्मिता पाटील यांचा जन्मदिवस
स्मिता पाटील यांनी अवघ्या बारा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये फार मोठा चाहतावर्ग निर्माण केला. कुठलाही अभिनयाचं प्रशिक्षण न घेतलेल्या स्मिता यांच्या अंगातच अभिनय भिनलेला होता . रेखीव आणि कमालीचा बोलका चेहरा ,त्यांचे पाणीदार आणि भावदर्शी डोळे यातली वेदना पाहून पाहणारा हेलावून जायचा .त्याचं बोलणं ते अत्यंत आशावादी आणि झपाटून टाकणार आणि त्याचं मौन देखील तितकाच बोलकं होतं. अभिनय करत असताना हालचालीही बोलायच्या आणि म्हणूनच त्यांचा अभिनय सहज सुंदर होता. दिखाऊ हावभावांना तिथे अजिबातच स्थान नव्हतं. प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकेत शिरताना त्या स्वतःला विसरून आपल्या बोलण्यात चालण्याची लकब बदलायची आणि विशिष्ट शैली आत्मसात करायच्या. त्यांच्या भूमिकांमधील वैविध्य अवर्णनीय होतं. मृणाल सेन यांनी म्हटल्याप्रमाणे ,”भारत हा असा देश आहे जिथे लोक विविध भाषा बोलतात भिन्न प्रकारचे पोशाख परिधान करतात आणि या ठिकाणी त्यांच्या भिन्न शाहीर शारीरिक वैशिष्ट्यांमुळे सहज रित्या ओळखू येतात पण मित्राला कुठूनही उचलून देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात टाका आश्चर्यकारकरित्या ती मूळची तिथलीच असल्यासारखी वाटते.” माणसांमध्ये त्याहूनही अभिनेत्यांमध्ये संवेदनशीलता असणे आवश्यक आहे. त्यामुळे तो विविध प्रकारच्या भावनांचा अनुभव घेऊ शकतो आणि स्मिता पाटील मध्ये ती होती. त्यांच्या मध्ये असणाऱ्या संवेदनशीलतेने मुळेच त्या पडद्यावर साकारत असलेल्या भूमिका स्वतःला जगू शकल्या .
त्यांना इतक्या विविध गोष्टींमध्ये रस होता आणि तो देखील इतक्या मोठ्या प्रमाणात की त्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना सतत काळजी लागून राहिली आहे की या गोष्टी तिच्या मार्गांमध्ये येऊन ती त्यावेळी ज्या चित्रपटात काम करत होती भूमिकेपासून विचलित होईल. पण असं कधीच घडलं नाही कारण तिचं स्वतःच्या इच्छेनुसारच,” स्विच ओन”व “स्विच ऑफ” होण्याची निर्मिती क्षमता त्यांच्याकडे होती. ज्या क्षणी त्या कॅमेर्यासमोर उभ्या राहायच्या त्या क्षणी त्याचं संपूर्ण लक्ष त्या भूमीत भूमिकेवर केंद्रित होऊन त्याच्याशी समरस व्हायच्या. ज्या क्षणी त्या तिथून बाहेर पडायच्या त्याक्षणी त्या नेहमीच्या स्मिता बनायच्या असा उल्लेख श्याम बेनेगल यांनी केलेला आहे. इतर वेळी इतर वेळी परिचित व्यक्ती मैत्रीण किंवा व्यावसायिक सहकारी म्हणून त्या परिचयाच्या होत्या. त्यांना त्या अत्यंत साध्यासुध्या , उत्साहाने सळसळणाऱ्या आणि उत्स्फूर्त अश्या तरुण स्त्री वाटायच्या.
ओम पुरी जे म्हणाले त्यातून अनेक अर्थ निघतात. ते म्हणाले ,”माझा विश्वास आहे की एक उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री बनण्यासाठी जर तुम्ही अगोदर चांगली व्यक्ती असाल तर तुम्ही रंगवत असलेले पात्र अधिक प्रभावी होतं!” हे स्मिता यांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. आपल्याला मिळणारी प्रसिद्धी अगदी सहजपणे स्वीकारली पण प्रसिद्धीची हवा कधीच त्यांच्या डोक्यात गेली नाही.
ता.क. - आयुष्यात एकदा तरी स्मिता पाटील यांच्यासारखेच फोटोशूट करण्याची मनोमन इच्चा आहे.
रुह-d-Soul